देवळोली सरपंचपदी पंढरीनाथ पाटील

। उरण । वार्ताहर ।
देवळोली ग्रामपंचायतींच्या प्रभारी सरपंचपदी शेतकरी कामगार पक्षाचे पंढरीनाथ पांडुरंग पाटील यांची निवड करण्यात आली. सरपंच काजल मंगेश पाटील यांनी कार्यकाळ संपण्यापूर्वीच राजीनामा दिल्यामुळे पंढरीनाथ पांडुरंग पाटील यांना एकमताने सरपंचपदी विराजमान करण्यात आले.


यावेळी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, पनवेल पंचायत समितीचे मा.सभापती गजानन माळी, पनवेल पंचायत समितीचे सदस्य जगदीश पवार, नानोशी माणघर ग्रामपंचायत सरपंच राजा पाटील, महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे कार्याध्यक्ष अनंत पाटील, मा.सरपंच काजल पाटील, ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र पाटील, सदस्या राजश्री पाटील, सदस्य विनोद पाटील, सदस्य मनोज भंडारकर, ग्रामसेवक वैशाली पावसकर, मा.सरपंच रामभाऊ पाटील, गुळसुंदे माजी सरपंच प्रकाश गाताडे, माजी उपसरपंच प्रकाश माळी, वासांबे माजी उपसरपंच संध्या संजय कांबळे, मा.सरपंच संदीप पाटील, मा.उपसरपंच यादव दिघे, मा.सदस्य भास्कर बडवी, मा.उपसरपंच गुरुनाथ पाटील, मा.उपसरपंच शमिल पाटील, शेकापचे जेष्ठ नेते भगवान कोंडीलकर, विठ्ठल पाटील, भगवान पाटील, गणपत देशमुख, किर्ती देशमुख, के एस पाटील, भगवान झिंगे, भिमराव भंडारकर, राजा पाटील, शेकापचे नेते राजेश पाटील, युवा नेते मंगेश पाटील, उमेश पाटील, श्रीकांत पाटील, प्रसाद पाटील, चित्कार पाटील, पी.पी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version