करण दीपक पाटील याला 22 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी
। कर्जत । प्रतिनिधी ।
सेंट जोसेफ शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन जाणार्या स्कुल बसमधील क्लिनरने पाच वर्षीय तीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडली. पालकांच्या तक्रारीनंतर आरोपीविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेत न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला 22 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एप्रिल 2024 पासून हा प्रकार सुरु असून त्या मुलींनी आपल्या घरी हा प्रकार सांगितल्यावर कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर रात्रीच आरोपी तरुणाला पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पकडले होते.
न्यालयाबाहेर पोलिसांचा फौजफाटा
त्या तरुणावर पालक वर्गातून आणि समाजातील अन्य लोकांकडून हल्ला होऊ नये आणि अनुचित प्रकार घडू नये यासाठी कर्जत पोलिसांनी खबरदारी घेतली. मात्र त्या तरुणाला कर्जत न्यायालयात दुपारी आणले असता पालकांनी गाडीतून उतरणार्या तरुणावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. अशी परिस्थिती उद्भवू शकते याची कल्पना पोलिसांना असल्याने पोलिसांनी मोठा बंदोबस्त कर्जत न्यायालय आवारात लावला होता. हा प्रकार सुरु असलेली स्कुल बसदेखील कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतली असल्याची माहिती जिल्हा पोलीस उप अधीक्षक डी.डी. टेले आणि कर्जत पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी दिली आहे.
कर्जत शहरातील तीन लहान विद्यार्थ्यांची लैंगिक छेड काढणार्या स्कुल बसचा क्लिनर करण पाटील याच्यावर मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी आणि अशी कृत्य गेली वर्षभर सुरु असताना शाळेेने पूर्णपणे डोळेझाक केली असल्याने सेंट जोसेफ स्कुलची मान्यता शासनाने रद्द करावी.
अॅड. कैलास मोरे,
उपाध्यक्ष, सम्यक विद्यार्थी परिषदेचे राज्य