पनवेलमध्ये लाठ्या, काठ्या, लोखंडी रॉड व क्रिकेट स्टम्पने मारहाण

। नवीन पनवेल । वार्ताहर ।
रस्त्यावरील काँक्रीटवरून मोटरसायकल गेल्याचा खोटा वाद करून घरात घुसून लाठ्या, काठ्या, लोखंडी रॉड व क्रिकेट स्टम्पने मारहाण केल्याबद्दल बाराहुन अधिक जणांविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळोजा गाव येथे राहणारे तन्वीर अजित पटेल यांचा मोठा भाऊ साबिर याचा मुलगा आरफात हा अक्सा मस्जिद भट्टीला मोहल्ला येथून मोटरसायकलवरून जात होते. यावेळी हनीफ पटेल यांनी रस्त्याच्या खाली पाण्याचा पाईप टाकून सिमेंट काँक्रेट केले होते. त्यावरून मोटरसायकल गेल्याच्या कारणावरून यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी हनिफ याने पुतण्यास शिवीगाळ केल्याबद्दल विचारणा केली. दरम्यान वाद मिटवला.
यावेळी नगरसेवक पापा पटेल यांनी पोलीस स्टेशनला तक्रार करू नका असे सांगितल्याने तन्वीर पटेल यांचे कुटुंबीय सर्वजण घरी होते. 22 मे रोजी जवाद मन्सूर पटेल त्यांचा मुलगा हाशीम व ईतर 25 व्यक्तींनी लाठ्या, काठ्या, लोखंडी रोड व क्रिकेट स्टंप घेऊन तनवीर पटेल यांच्या घरात घुसून वडील अजित पटेल व कुटुंबियांना शिव्या देऊन मारहाण करण्यास सुरुवात केली. यात तनवीर पटेल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी जवाद पटेल, काशिम पटेल, हनिफ पटेल, सजीर पटेल, सलमान पटेल, सबीर पटेल, ईरबाज़ पटेल, नाजीम पटेल, अब्दुल पटेल, ताजुद्दीन पटेल, कुमार पसारा, सौभान पटेल व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version