झुंझार पोयनाड आयोजित क्रिकेट स्पर्धेत पनवेल क्रिकेट अकॅडमी विजयी

। पोयनाड । वार्ताहर ।
झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित लेदर बॉल एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या दुसर्‍या उपांत्य फेरीत पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमी संघाने 64 धावानी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पनवेल क्रिकेट स्पर्ट्स अकॅडमी विरुद्ध प्रतिक क्रिकेट अकॅडमी पनवेल ह्या दोन पनवेल तालुक्यातील तुल्यबळ असलेल्या संघान मध्ये उपांत्य फेरीच्या झालेल्या सामन्यात प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारलेल्या पनवेल अकॅडमीने 40 षटकांन मध्ये 7 गड्यांच्या मोबतल्यात 259 धावा धावफलकावर नोंदवल्या. जयनिल नंदा यांनी दिमाखदार फलंदाजी करत 88 धावा ठोकल्या, त्याला श्रवण खरोल 29, वेदांत सोनावले 44 आणि हर्ष विखारे यांनी 25 धावा काढून त्याला सुरेख साथ दिली. प्रतिक क्रिकेट अकॅडमीकडून क्रिश बहिरा यांनी 3 तर अमित शर्मा यांनी 2 फलंदाज बाद केले. 259 धावांचा पाठलाग करतांना प्रतिक क्रिकेट अकॅडमी कडून स्लामीवीर गुरुलीन सिंघ 43, अमित शर्माने 35, शार्दूल तेलगे 24 आणि साईश सुर्वे यांनी 21 धावा काढल्या.


40 षटकात 9 गडी गमावत 195 धावापर्यंत प्रतिक क्रिकेट अकॅडमी संघाने मजल मारली. पनवेल क्रिकेट अकॅडमीकडून क्रिश पाटील 4 तर अनिष निमसे यांनी 3 फलंदाज बाद केले. पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमीने सामना 64 धावानी जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. बक्षिस वितरणाच्या कार्यक्रमासाठी पोयनाड पोलीस स्टेशनचे पीएसआय महादेव जाधव,भूषण चवरकर, अन्वर बुराण,किशोर तावडे, दिपक साळवी,अजय टेमकर,सुजित साळवी,नसरुद्दीन औसेकर, सागर कांबळे ,अँड.पंकज पंडित,प्रतिक मोहिते तसेच पोयनाड विभागातील क्रिकेट रसिकांनी उपस्थिती लावली.

Exit mobile version