। पालघर । प्रतिनिधी ।
वातावरणातील बदल, जंगलातील जनावरांच्या निवार्यावर मानवी अतिक्रमण तसेच अन्न पाण्याच्या शोधात जंगली प्राण्यांचा वावर हा मानव वस्तीकडे वाढू लागला आहे. यात जव्हार शहरातील सोनारआळी हा परिसर हा जंगल आणि दरीला लागूनच असल्याने येथील घरासमोरच्या पाळीव प्राण्यांवर बिबट्याचे हल्ले होत आहेत. रविवारी (दि.24) पहाटेच्या सुमारास जव्हार शहरातील भाग असलेल्या सोनार आळी परिसरात पशुपालक बोराडे यांच्या राहत्या घरामागील दरीतून बिबट्याने गोठ्यात प्रवेश करून गोठ्यात बांधलेल्या म्हैशींपैकी एका पारडावर हल्ला करून ठार केले. यात पशुपालकाचे सुमारे 10 हजार रुपयांचे नुकसान झाले असून वनविभागाकडून नुकसान भरपाईची मागणी नुकसानग्रस्त पशुपालक सोमनाथ बोराडे यांनी केली आहे.