। रोहा । प्रतिनिधी ।
राज्यात सत्तेचा खेळ रंगला असला तरी रोहा तालुक्यात मात्र कायमस्वरूपी प्रांताधिकारी नाही. तहसीलदार रजेवर असल्यामुळे विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले मिळण्यास होणार्या विलंबामुळे पालक आणि विद्यार्थी वर्ग मेटाकुटीला आला आहे. दहावी, बारावीचे निकाल जाहीर झाल्यापासून जातीचे दाखले,उत्पन्नाचे तसेच नॉन क्रिमीलेयर दाखले, डोमीसाईल दाखले मिळवण्यासाठी विद्यार्थी व पालक तहसिल कार्यालयातील सेतू कार्यालयात गेले असता तहसीलदार रजेवर आहेत.प्रांताधिकारी पेण यांच्याकडे रोहा प्रांत कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार असल्याने दाखले पेण येथे जातात यामुळे उशीर होत असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री पद रोह्यात आहे.पण सत्तेचा खेळ खेळण्यात मग्न असणार्या या लोकप्रतिनिधीना जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याने जनता मात्र विविध प्रकारचे दाखले मिळवताना हवालदिल झाली आहे.