। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईत आणखी एक भीषण अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, एका पाच मजली इमारतीचा भाग अचानक कोसळला आहे. या अपघातात आतापर्यंत 34 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं असून तब्बल 5 जण ढिगार्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही पाच मजली इमारत दक्षिण मुंबईतील फोर्ट भागात होती.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलीस दाखल झाले असून सुरक्षा कर्मचार्यांकडून तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी 7.30 वाजता ही घटना घडली. इमारतीमध्ये दुरुस्तीचं काम सुरू होतं. याचवेळी हा अपघात झाला आहे.