आंबिवली येथील युवकांचा पक्षप्रवेश

। रसायनी । वार्ताहर ।
मानव हित लोकशाही पक्षामध्ये खाने आंबिवली येथील तरुणांनी रायगड जिल्हा अध्यक्ष कृष्णा झोंबाडे यांच्या उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश केला. खाने आंबिवली येथे झालेल्या प्रवेश कार्यक्रमात येथील लंकेश खवळे, रोहित काळोखे, नवनाथ पवार प्रदीप खवळे, सुरेश मस्के, राहुल मस्के, राहुल आरणे, विजय लोखंडे, समाधान खवळे ,दिपक खवळे ,ईश्‍वर खवळे ,ललकार ढवळे या तरुणांसह समाज बांधवांनी मानवहीत लोकशाही पक्षात जाहीर प्रवेश करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लहुजी वस्ताद साळवे यांच्या विचारांचा झेंडा हाती घेतला आहे.
मानव हित लोकशाही पक्षाच्या खालापूर तालुका अध्यक्ष पदाची निवड यावेळी करण्यात आली असून अमोल भाऊ मस्के त्यांना निवडपत्र जिल्हा अध्यक्ष कृष्णा झोंबाडे यांच्याहस्ते देण्यात आले.यावेळी आरपीआय रसायनी शहर युवा अध्यक्ष पंकज सोनावळे ,पनवेल तालुका अध्यक्ष तथा तूराडे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विश्‍वनाथ गायकवाड उपजिल्हाध्यक्ष हिंदुराव बाबर यांच्यासह खाने आंबिवली येथील मातंग समाजाचे तरुण व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version