श्रावणसरी नृत्य स्पर्धेत पार्वती महिला मंडळ प्रथम

। म्हसळा । वार्ताहर ।

तालुका व शहर महिला संघटना राष्ट्रवादी काँग्रेसपक्षा तर्फे मंगळावार दि.09 ऑगस्ट रोजी महिलांकरिता नृत्यस्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रेक्षक वर्गाने हजारोच्या संख्येने उपस्थित राहुन दाद दिली. खेडोपाड्यातील गाववाडी, शहरातील महिला मंडळ, महिला कला पथकांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन आपल्यातील कलागुण दाखवून देण्याचे आवाहन सोनल घोले व त्यांच्या सहकार्‍यांनी केले होते. स्पर्धेत मेंदडी, काळसुरी, खारगाव खुर्द,खारगाव बुद्रूक, बनोटी,गणेश नगर, तुरुंबाडी येथील 14 महीला मंडळ स्पर्धकांनी भाग घेत वेगवेगळ्या प्रकारचे कला व गायन नृत्य सादर केले.

स्पर्धेत पार्वती महीला मंडळ आगरी समाज मेंदडी, गावदेवी महीला मंडळ खारगाव बुद्रुक, सरस्वती महीला मंडळ बनोटी या मंडळांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला तर उत्तेजनार्थ बक्षीस खारगाव खुर्द खालची आळी आणि अंजली महीला मंडळ मेंदडी यांनी प्राप्त केले. स्पर्धा परीक्षक काजल पाखुर्डे,माणगाव यांनी गुणांकन केले. यशस्वी स्पर्धकांसह स्पर्धेत सहभागी सर्वच महीला मंडळांना आमदार आदिती तटकरे याच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

अलि कौचाली,समीर बनकर,असहल कादिरी,तहसिलदार समीर घारे, महादेव पाटील, छाया म्हात्रे,उज्वला सावंत,मधुकर गायकर,संदिप चाचले,सोनल घोले,रेश्मा काणसे, जयश्री कापरे, सरोज म्हाशिलकर, शगुप्ता जहांगीर, वृषाली घोसालकर, लक्ष्मण कांबळे, अनिल बसवत, सतिश शिगवण, संतोष नाना सावंत, महेश घोले, किरण पालांडे, गजानन पाखड, शाहिद उकये, चंद्रकांत पवार आदी उपस्थित होते.

Exit mobile version