निजाम फोपळूणकर यांना पितृशोक

। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव तालुक्यातील मोर्बा येथील शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य निजाम फोपळूणकर यांचे पिताश्री अब्दुल रहिमान आदम फोपळूणकर यांचे शुक्रवारी (दि.22) रात्री 8 वाजता राहते घरी मोर्बा येथे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 78 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने फोपळूणकर कुटुंबियांबरोबरच माणगाव तालुका शेतकरी कामगार पक्षावर शोककळा पसरली आहे. पैगंबरवासी अब्दुल रहिमान आदम फोपळूणकर हे शेकापचे ज्येष्ठ नेते स्व.प्रभाकर पाटील यांचे खंदे व विश्‍वासू सहकारी होते. शेकापचे निष्ठावंत कार्यकर्ते तसेच शांत व संयमी स्वभावाचे प्रेमळ असे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची सबंध रायगड जिल्ह्यात बहुजन समाजात ओळख होती. पैगंबरवासी अब्दुल रहिमान आदम फोपळूणकर हे मोर्बा ग्रामपंचायतीचे पाच वर्ष उपसरपंच होते. शुक्रवारी रात्री 8 वाजता त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांचा मोर्बा येथील कब्रस्थानात दफनविधी करण्यात आला.यावेळी अंत्यविधीला मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

Exit mobile version