पाच वर्षात प्रत्येक तालुक्यात पतसंस्थेच्या शाखा निर्माण करणार

। पनवेल । वार्ताहर ।
रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या सेवक सहकारी पतसंस्थेची 30 वी सर्वसाधारण वार्षिक सभा एम. एन. पाटील सहकार भवन, पेण येथे चेअरमन रवींद्र वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. महाराष्ट्र राज्य टी.डी. एफ संघटनेचे कार्याध्यक्ष आणि एम.एन. पाटील सहकार पॅनलचे पॅनल प्रमुख नरसु पाटील यांच्या हस्ते जी.एम. पाटील सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले.
पाटील यांनी संचालक मंडळाच्या कार्याचा गौरव करताना पतसंस्थेच्या विकासामध्ये हातभार लावणार्या सर्व मान्यवरांचे जाहीर आभार व्यक्त केले. आणि येत्या पाच वर्षात विद्या सेवक पतसंस्थेच्या शाखा प्रत्येक तालुक्यात निर्माण करणार आणि पतसंस्थेला आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करणार असे उपस्थितांना अभिवचन दिले. वार्षिक सभेच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक के. पी. पाटील केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमाकांत गावंड यांनी केले. आभार प्रदर्शन उपाध्यक्ष नरेश हर्णेकर यांनी केले.
इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, आदर्श शिक्षक व संचालक मंडळाचा सत्कार नरसु पाटील, जी.एम. पाटील, मिलिंद जोशी, बाबा गडगे, आर.एन. म्हात्रे, आर.के. म्हात्रे, टी.बी. मोकल, डी.आर. मोकल, बी.पी. म्हात्रे, शिवाजी माने आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

Exit mobile version