| महाड | प्रतिनिधी |
गणपती सणानिमित्त महाडमध्ये आ. भरत गोगावले यांच्या अध्यक्षते खाली संत रोहिदास सभागृहामध्ये शांतता कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला सर्व विभागातील अधिकारी तसेच शहर आणि ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी मांडलेल्या अडचणी दुरकरण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तर या बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनी गणेशभक्तांच्या सेवेसाठी 24 तास पोलीस तैनात असल्याचे सांगितले.
या बैठकीला प्रांत अधिकारी ज्ञानोबा बानापुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, तहसीलदार महेश शितोळे, प्रभारी मुख्य अधिकारी महाड नगर पालिका संतोष माळी, महाड शहर, तालुका एमआयडीसी आणि पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, एसटी महामंडळाचे अधिकारी शिवाजी जाधव, विज मंडळाचे शिंदे, जिल्हा परिषदेचे देशमुख त्याच बरोबर शहरातील अनेक मंडळाचे अध्यक्ष गणेश भक्त ग्रामीण आणि शहर भागातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
महाडमध्ये शांतता कमिटीची बैठक
