। पनवेल । प्रतिनिधी ।
रस्ता ओलांडणाऱ्या 41वर्षीय वेटरला अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत त्याचा मृत्यू झाला. या अपघाता प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनेश्वर चंद्रशेखर दास हा कोन गाव येथे राहत असून, तो मिठास स्वीट मार्ट समोरील रस्त्यावर जुना मुंबई -पुणे महामार्ग कोनगाव येथे पायी रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने भरधाव वेगाने येऊन धनेश्वर याला धडक दिली. या धडकेत त्याच्या डोक्याला, खांद्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून पळून गेला. या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस अधिक तपास करत आहेत.







