| पनवेल । वार्ताहर ।
नव भारतीय शिव वाहतूक संघटनेने अवैध वाहतूक करणान्या विरोधात आरटीओ कार्यालयात उपोषण करण्याचा इशारा दिला होता. नव भारतीय शिव वाहतूक संघटनेच्या उपोषणाच्या इशार्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालय कामाला लागले असून वायुवेग पथकाद्वारे अवैध वाहतूक करणार्यांवर कारवाई करणार्यास सुरुवात केली असून त्यांच्या कडून 2 लाख 78 हजारांचा दंड वसूल केला.
राज्यभरात चालत असलेल्या अवैध वाहतूक करणार्यांवर कडक कारवाई झाली नाही तर 28 डिसेंबर रोजी आमदार आशिष शेलार आणि भारतीय जनता पार्टी ट्रान्सपोर्ट सेल प्रणित नव भारतीय शिव वाहतूक संघटनेचे हाजी अराफत शेख यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात येईल असा इशारा निलेश निम्हण व संकेत पाटील यांनी दिला होता. उपोषणाच्या इशार्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालय कामाला लागले असून वायुवेग पथकाद्वारे कळंबोली मॅकडोनाल्ड, खालापूर टोल नाका तसेच जुना मुंबई-पुणे महामार्गावर विशेष तपासणी मोहिम राबवण्यात आली. तपासणी दरम्यान प्रवाशांच्या वैयक्तिक सामाना व्यतिरिक्त बसमधील व्यापारी मालाची अवैध वाहतूक करणार्या 21 प्रवासी बसेसवर कारवाई करण्यात आली. यामध्ये त्यांच्या कडून 2 लाख 78 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात असून यापुढे सुद्धा सदर कारवाई पुढे सुरु राहणार असल्याचे प्रादेशिक वरिवहन कार्यालयाद्वारे देण्यात आली आहे.