पेणची कन्या छोट्या पडद्यावर चमकली

अर्चना पाटील सहकलावंत

| वाघ्रण | दीपक पाटील |

शिर्की, ता.पेण येथील अर्चना राजेश पाटील स्टार प्रवाहवर सध्या सुरु असलेल्या तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत सहकलाकार म्हणून काम करत आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्यांसोबत सहकलाकार म्हणून नर्सच्या भूमिकेत अभिनय करताना पाहून पेणसह सर्व तालुक्यातील प्रेक्षकांकडून तिच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे.

शालेय जीवनापासून अभिनयाची आवड असलेल्या अर्चनाला छोट्या पडद्यावर येण्यासाठी स्ट्रगल करावा लागला आहे. नाटकामधून तिने अभिनयाला सुरुवात केली असून आता पर्यंत वेगवेगळ्या वाहिन्यांवर जवळपास अकरा मराठी मालीका अभिनय केल्या आहेत. या मध्ये प्रामुख्याने झी मराठी, कलर्स मराठी, सोनी मराठी आणि स्टार प्रवाह या मराठी वाहिन्यांचा समावेश आहे. वेगवेगळ्या भूमिका साकारताना एकट्या स्टार प्रवाहवर नर्स ही भूमिका फुलाला सुगंध मातीचा, सहकुटुंब सहपरिवार आणि आताची तुझेच गीत मी गात आहे या मराठी मालिकांचा समावेश आहे. लहान, मोठ्या मिळतील त्या भूमिका करण्याचा तिचा मानस आहे. अभिनय क्षेत्रात करीअर करण्यासाठी अर्चनाला पती राजेश पदम पाटील यांचा पाठिंबा आहे.

सध्या सुरु असलेली मालिका ही सरीता तेजेंद्र नेसवणकर निर्मित असून या मध्ये अभिजीत खांडकेकर, उर्मिला कोठारे, प्रिया मराठे अशा प्रसिद्ध कलाकारांनी अभिनय करीत असलेली आहे. चांगल्या कथानकामुळे प्रेक्षक सुद्धा चांगला लाभत आहे. अर्चना एका खेडेगावातून पुढे जात आहे. तिला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

काही महिन्यांपूर्वीच पीएनपी नाट्यगृह अलिबाग येथे अनंत पांचाळ यांच्या विठ्ठल विठ्ठल विठ्ठला या नाटकामध्ये मुख्य भूमिका केली होती. शॉर्ट फिल्म, नाटक, जाहिरात, टीव्ही सिरीयलमध्ये अभिनय करत आहे. आता मला मोठ्या पडद्यावर काम करण्याची मनापासून इच्छा आहे.

अर्चना पाटील
अभिनेत्री
Exit mobile version