| खरोशी | वार्ताहर |
नुकत्याच रायगड किकबॉक्सिंग असोसिएशनने पनवेल सुकापूर मध्ये लक्ष्मी पब्लिक स्कुल येथे जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत पेण येथील खेळाडूंनी चांगलीगल कामगिरी करत तालुक्याचे नाव लौकीक केले आहे. या खेळाडूंमध्ये पेण तालुक्यातील नैतिक पाटील, रजित पाटील, रोहन पाटील, जीवेश पाटील, अनुज बलदेवसिंग लिंगवल, रितेश ठाकूर, सार्थक ठाकूर, वंश घरत, प्रिन्स पाटील, आयुष पाटील, वेदांत पाटील (सर्व सुवर्णपदक)
मोहसीन मिनहाज अनसारी, गौरव लटपटे, भावेश पाटील, मंथन ठाकूर, शिवम पाटील, ऋतूराज घरत, रोनक पाटील, रुद्र पाटील, स्पर्श पाटील, पार्थ पाटील, उंमुक्त पाटील(सर्व रौप्य)
मुलींमध्ये उत्तरा विनायक पाटील,अर्पिता घरत( सुवर्ण) श्रेया विशाल सुरते, समृद्धी चेतन पिंगळे (रौप्य), सौम्या संतोष गोळे, जान्हवी विनायक पाटील, कृपा म्हात्रे, रचिता गावंड(कांस्य) यांनी पदके पटकावून पेण तालुक्याला तृतीय क्रमांकाची चॅम्पियनशिप मिळवून दिली. ह्या सर्व खेळाडूंना रविंद्र म्हात्रे प्रथमेश मोकल, विनायक पाटील, तसेच आयुष रसाळ यांचे मार्गदर्शन लाभले होते. ह्या सर्व खेळाडूंची बारामती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.या स्पर्धेच्या वेळी महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशन चे उपाध्यक्ष तसेच रायगड किकबॉक्सिंग असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. मंदार पनवेलकर यांनी पेणच्या प्रथमेश मोकल ह्याची जिल्हा किकबॉक्सिंग असोसिएशन च्या सचिव पदी नियुकी केल्याचे घोषित केले. व त्याला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धा प्रशांत घांगुर्डे निलेश भोसले चिंतामणी मोकल , प्रतीक करांडे यांच्या मार्गदर्शन खाली पार पाडण्यात आल्या.