आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| नेरळ | प्रतिनिधी |

189 कर्जत विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या निवडीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. तशा स्वरूपातील रीट पीटिशन सुधाकर परशुराम घारे यांच्याकडून दाखल करण्यात आले आहे.

कर्जत विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी शिवसेना पक्षाचे उमेदवार आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. न्यायालयाकडून याचिका स्वीकारली असून, सदर रिट पीटिशनमुळे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांच्याकडून महेंद्र थोरवे यांच्या निवडणूक विजयाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आलेली आहे. या याचिकेत शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांनी खोटा अपप्रचार, भ्रष्टाचार तसेच नाम साधर्म्य उमेदवार उभे करून चुकीच्या आणि भ्रष्ट पद्धतीने निवडणुकीमध्ये निसटता विजय मिळविला आहे. त्याचवेळी महेंद्र थोरवे यांच्याकडून खोटा अपप्रचार, भ्रष्टाचार, दादागिरी, डमी उमेदवार याबाबतचे सर्व पुरावे जमा करून अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी याचिका दाखल केली आहे. पुरावे तपासून पुरावे योग्य असल्याचे मान्य करून न्यायालयामध्ये याचिका दाखल करून घेण्यात आली आहे.

Exit mobile version