पिंगळसई प्रीमियर लीग

आई जोगेश्‍वरी कृपा संघ विजेता

| खांब । वार्ताहर ।

रोहा तालुक्यातील पिंगळसई येथे ग्रामस्थ मंडळाचे वतीने होळी सणाचे औचित्य साधून संपन्न करण्यात आलेल्या पिंगळसई प्रीमियर लीगचा आई जोगेश्‍वरी कृपा हा संघ विजेता ठरला आहे. येथील ग्रामस्थ मंडळ व तरूणाईच्या संकल्पनेने 4 थ्या पर्वातील खेळविण्यात आलेल्या व संघ मालक म्हणून जगदीश देशमुख, प्रशांत स. देशमुख, रविंद्र कि देशमुख, प्रफुल्ल व. देशमुख तसेच, देविदास देशमुख या संघ मालकांनी पुरस्कृत केलेल्या या स्पर्धेत संघांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. तर स्पर्धेतील प्रत्येक सामन्यातील लढती या अटीतटीच्या झाल्या. तर आई जोगेश्‍वरी कृपा या संघाने स्पर्धेतील आपले वर्चस्व सुरूवातीपासूनचे ते शेवटपर्यंत कायम राखले. अखेर अंतिम सामन्यात देखील या संघाने सर्वोत्तम कामगिरी करून विजेतेपदाचा बहुमान पटकावला. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज व मालिकावीर तसेच, अंतिम विजेता ठरलेला आई जोगेश्‍वरी कृपा या संघाला उपस्थित मान्यवरांचे हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version