उरणमध्ये जलवाहिनी फुटली

लाखो लिटर पाणी वाया
। जेएनपीटी । वार्ताहर ।
उरण परिसराला पाणी पुरवठा करणारी एमआयडीसीची तीन इंच व्यासाची जलवाहिनी मंगळवारी (दि.5) सकाळी पुन्हा एकदा अचानक फुटण्याची घटना घडली आहे. जेएनपीटी टाऊनशिप – नवघर दरम्यान फुटलेल्या उच्च दाबाच्या जलवाहिनीमुळे सुमारे 25 फुट उंचीपर्यंत पाण्याचे कारंजे उडून लाखो लिटर पाणी वाया गेले.
उरण तालुक्यातील औद्योगिक, शहर व ग्रामीण परिसरातील दिड लाख नागरिकांना एमआयडीसीच्या माध्यमातून रानसई धरणातुन पाणी पुरवठा केला जातो. मंगळवारी (दि.5) जेएनपीटी टाऊनशिप-नवघर दरम्यान एमआयडीसीची तीन फूट व्यासाची पाण्याची मुख्य जलवाहिनी अचानक फुटली. या फुटलेल्या जलवाहिन्या मधुन 25 फुटांपर्यंत पाणी उडाले होते. तासभर पाणी मोठ्या प्रमाणावर उडाल्याने रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते.

उच्च दाबामुळे वेल्डिंग जॉइंडला तडा गेल्याने जलवाहिनी फुटली. लगेचच दिड तासात जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला.
रणजित काळबागे, एमआयडीसीचे उपअभियंता

Exit mobile version