। पनवेल । वार्ताहर ।
तळोजा फेज-2 वसाहत मधील रस्त्यांवर सर्वत्र खड्डे पडले असून, रस्त्यांवरील खड्डयांमुळे वाहन अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असतानाही रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याकडे सिडको प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे रस्त्यांवरील खष्यात एखाद्या निष्पापाचा बळी जाण्याची शक्याता आहे.
रस्त्यांवरील खड्डेयाचा नाहक त्रास वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवरील खड्डे वाहन अपघाताला आमंत्रण देत असूनही खड्डे वेळेत बुजवण्यात येत नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
गंभीर बाब म्हणजे खड्डेमय रस्त्यावरुन जाताना दुचाकीस्वारांची तारांबळ उडत आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहन अपघात घडण्याची शक्यता असतानाही सिडको प्रशासन रस्त्यांवरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. दरम्यान, तळोजा फेज-2 वसाहत मधील रस्ते दुरुस्त करण्याच्या कामाची निविदा काढण्यात येणार असून, लवकरच सर्व खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे,असे कळंबोली येथील सिडको कार्यालयातून सांगण्यात आले.