वाडगाव येथे वृक्षारोपण

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कृषी दिनाचे औचित्य साधून वाडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी चिंच 100, निगडी 10000, करंज 100 अशा विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली.

यावेळी वाडगाव सरपंच सरिता भगत, उपसरपंच नीलम थळे, ग्रामसेवक रचना भगत, जयेंद्र भगत, प्रसाद पाटील, नरेश थळे, सजना नाईक, मंदा पवार, प्रमिला कुळे, शुभांगी भगत, अंजली भगत, व ग्रामस्थ शरद थळे आदी उपस्थित होते.

Exit mobile version