। खोपोली । प्रतिनिधी ।
माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत साजगांव ग्रामपंचायत आणि वनविभागाच्या संयुक्त विद्यमाने साजगांव येथील पुरातन विठ्ठल मंदिर परिसरातील वनविभागाच्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले आहे.
साजगांव ग्रामपंचायतीच्या हाद्दीत अनेक मोठमोठे कारखाने आहेत. कारखान्यांचा होणारा प्रदुषण टाळण्यासाठी सरपंच विनोद खवळे यांना वृक्षारोपणावर भर दिला असून माझी वसुंधरा अभियानात अंतर्गत ग्रामपंचायतीने नऊ एकरात विविध प्रकारची 900 झाडे लावली आहेत. वनविभाग आणि साजगांव ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने पुरातन विठ्ठल मंदीर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.याप्रसंगी सरपंच विनोद खवळे, वनविभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच साजगांव ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते. लावलेल्या झाडांचे संवर्धन करण्यासाठी ठिबक सिंचनाची व्यवस्था केली आहे. बाजूलाच जलयुक्त शिवार अंतर्गत मोठा बंधारा बांधण्यात येणार आहे. या बंधार्यातील पाण्याचा उपयोग झाडांच्या संवर्धनासाठी होईल अशी माहिती साजगांव ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद खवळे यांनी बोलताना दिली आहे.