कृषी सप्ताहानिमित्त वृक्षारोपण

| रसायनी | वार्ताहर |

कृषी सप्ताहानिमित्त प्रसोल केमिकल्स होनाड आणि रसायनी पाताळगंगा नदी व पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट तसेच, शिवछत्रपती विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील परिसरात विविध जातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

दरम्यान, आंबा, वड, पिंपळ, फणस, जांभुळ आदी वृक्षांची लागवड शालेय मैदानाच्या परिसरात करण्यात आली. तसेच प्लास्टिक बंदी म्हणून कापडी वाटप करुन नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगण्यात आले. यावेळी अरुण जाधव अध्यक्ष पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट, भास्कर लांडगे शाळा कमिटी अध्यक्ष, मुख्याध्यापक जाधव, निलेश जाधव, पगारे मॅडम, आव्हाड मॅडम, सोनवणे, देव मुंढे, विर आदी शिक्षक उपस्थित होते.

Exit mobile version