लोधिवली ग्रा.पं.चा स्तुत्य उपक्रम
चौक | वार्ताहर |
कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचे महत्त्व संपूर्ण जगाला कळले, त्यामुळेच जास्तीत जास्त ऑक्सिजन देणारी व आयुर्वेदिक झाडांची लागवड केल्याचे लोधिवली ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब गोलार यांनी सांगितले.
खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत लोधिवली यांच्यावतीने ग्रामपंचायत हद्दीतील सर्व शासकीय जागेत जास्तीत जास्त ऑक्सिजन देणारी व आयुर्वेदिक औषधे देणारी झाडांची लागवड ग्रामपंचायत यांनी स्वखर्चाने लावून कृषी दिन साजरा केला. लावलेल्या झाडांची वाढ, त्यांचे संगोपन, देखभाल ग्रामपंचायत हद्दीतील सर्व ग्रामस्थ यांच्यावर व स्वतः ग्रामपंचायत करणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब गोलार यांनी सांगितले. यावेळी प्रशासक व विस्तार अधिकारी शैलेश तांडेल, पत्रकार अमोल सांगळे, एकनाथ सांगळे, अशोक पाटील, ग्रामपंचायतीचे आजी-माजी सरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.