अनियमित गाड्यांमुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल

मुरूड आगारातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत

| मुरूड | प्रतिनिधी |

मुरूड आगारातील वाहतूक व्यवस्था सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. अनियमित वाहतूक सेवेमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. तसेच शहरात शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

मुरूड आगारातून सावली मिठागर या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी सकाळी सहाच्या सुमारास मिठागर येथून एस.टी. सोडण्यात यावी. तसेच अलिबाग मुरुड फेरी नसल्याने विद्यार्थ्यांसाठी सकाळी व सायंकाळी फेरी सुरू करण्यात यावी व दररोज अनियमित सुरू असलेली वाहतूक व्यवस्था सुरळीत करा. वेळेतच गाड्या सोडा अशा प्रकारच्या मागण्यांचे निवेदन आगार प्रमुखांना देण्यात आले आहे.

या अनियमित वाहतूक फेऱ्यांमुळे होत असलेल्या त्रासामुळे प्रवासी व शालेय विद्यार्थ्यांनी मुरूड शहर उद्धव ठाकरे शिवसेनेच्या शहर प्रमुखांना आपली कैफियत मांडली. त्यावेळी शहरप्रमुख आदेश दांडेकर यांनी आक्रमक पवित्रा घेऊन मुरूड आगार व्यवस्थापक यांना लेखी निवेदन देऊन अनियमित वाहतूक व्यवस्था सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यावेळी प्रशांत कासेकर, माजी नगराध्यक्ष बाळकृष्ण गोंजी, कृणाल सतविडकर, संतोष दांडेकर, विजय वाणी, निजाम हदादी, यश माळी इ. शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version