गुरचरण जमीन हडपण्याचा डाव उघड

| रसायनी | प्रतिनिधी |

भिंगार ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत एका कंपनीने केलेल्या थेट फसवणुकीचा आणि शासनाच्या आदेशांची पायमल्ली करणाऱ्या कृत्यांचा अखेर भांडाफोड झाला आहे. ग्रामस्थांच्या हक्काच्या, पारंपरिक वहिवाटीच्या रस्त्यावर कोणतीही पूर्वसूचना, परवानगी किंवा ग्रामपंचायतीची मंजुरी न घेता बळकावलेली जागा ग्रामस्थांच्या एकजुटीने ताब्यात घेण्यात आली आहे.

वाधवा ग्रुप ने भिंगार ग्रामपंचायतीच्या मालकीची गुरुचरण जमीन बेकायदेशीर कागदपत्रांच्या आधारे स्वतःच्या नावे करून घेतली होती. त्यांची न्यायालयीन लढाई सुरु होती. भिंगारवाडी गावकऱ्यांचा पारंपरिक रस्ता याच जागेतून जातो. मात्र, त्या रस्त्यावर स्वतःची रहदारी सुरू करून ग्रामस्थांचा हक्क हिरावून घेतला होता. मात्र, ग्रामस्थांचा एकजुटीचा विजयाने बळकवलेली जागा ग्रामस्थांना पुन्हा त्यांच्या ताब्यात मिळाली. यावेळी ग्रामस्थांची अभूतपूर्व एकजूट दिसून आली. या निर्णायक वेळी पनवेल पंचायत समितीच्या सदस्या योगिता लहाने, योगेश लहाने, सरपंच, माजी उपसरपंच, युवक वर्ग आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. हा लढा फक्त एका रस्त्यासाठी नव्हता तो गावच्या स्वाभिमानासाठी होता, असेही सांगण्यात आले.

Exit mobile version