कोकण मराठी साहित्य परिषदतर्फे कविसंमेलन

| रोहा । वार्ताहर ।
कोकण मराठी साहित्य परिषद रोहा शाखेची मासिक सभा व कविसंमेलन रोहा येथे संपन्न करण्यात आले. या वेळी रोहा शाखेच्या नवीन कार्यकारीणीचा एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्याने शाखेची धुरा यशस्वीपणे सांभाळणार्‍या संध्या दिवकर व त्यांचे सहकारी पदाधिकारी यांचा गौरव करण्यात आला. हनुमंत शिंदे, नारायण पानावकर, शरद कदम, भरत चौधरी, अजित पाशिलकर, अमिषा बारस्कर, नेहल प्रधान, संध्या दिवकर यांनी कविता सादर केली.

सदर कवीसमेलनांस संध्या दिवकर, सुखद राणे, विजय दिवकर, हनुमंत शिंदे, सुधीर क्षीरसागर, नारायण पानवकर, शरद कदम, अमिषा बारस्कर, नेहल प्रधान, अजित पाशिलकर, स्वराज दिवकर, अनघा पाशिलकर, ओम पाशिलकर अनंत पाशिलकर उपस्थित होते.

Exit mobile version