इमारत पाडताना झालेल्या अपघातात पोकलेन चालकाचा मृत्यू

पनवेल | विशेष प्रतिनिधी |

कामोठे वसाहतीमधील धोकादायक घोषित करण्यात आलेल्या एका इमारतीच्या तोडकामा दरम्यान झालेल्या अपघातात एका पोकलेन चालकाचा मृत्यू झाला आहे.

कामोठे वसाहतीमधील सेक्टर 35 येथे असलेली ब्लु हेवन ही इमारत राहण्यासाठी धोकादायक ठरवण्यात आली होती. पालिकेने दिलेल्या नोटीसीनंतर या इमारतीच्या पाडकामाची कारवाई विकसकाकडून सुरु होती. या कामादरम्यान सुमारे 5.45 या वेळेत घडलेल्या दुर्घटनेत एका पोकलेन चालकाला आपला जीव गमवावा लागला आहे. महत्वाचे म्हणजे पाडकामा सुरु असताना कार्यरत मजुरांना कोणत्याही प्रकारची सुरुक्षा उपकरणे पुरवण्यात आलेली नसल्याचे लक्षात आल्याने माजी नगरसेविका हेमलता गोवारी यांचे पती रवी गोवारी यांनी काहीच दिवसापूर्वी याबाबतची तक्रार कामगार आयुक्त पवार यांच्या टकडे केली होती.

गोवारी यांनी केलेल्या तक्रारीनंतरही कामगार आयुक्तालयाकडून या प्रकरणाची दखल घेण्यात न आल्याने आज एका कामगाराला आपले प्राण गमवावे लागल्याचा आरोप रवी गोवारी यांनी केला आहे. तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी याकरिता प्रयत्न करणार असल्याचे मत गोवारी यांनी व्यक्त केले आहे.

Exit mobile version