| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
तीन लाख रुपयांची लाच घेणारा पोलीस हवालदार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. पोस्कोच्या गुन्हयातून वाचवण्यासाठी त्याला गुरुवारी रंगेहाथ पकडण्यात आले.
रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी ही कारवाई केली. विशाल वाघाटे असे आरोपीचे नाव आहे. तो रायगड पोलीस दलातील मुख्यालयात कार्यरत आहे.
तक्रारदार यांच्यावर पॉक्सो कायद्या अंतर्गत कारवाई न करण्यासाठी व योग्य ती मदत करण्यासाठी त्याने पाच लाख रुपयांची लाच मागितली होती. तीन लाख रुपये घेताना त्याला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.






