। पनवेल । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील मौजे जांभूळपाडा येथील 12 गुंठे क्षेत्रफळातील शेतातील घर आणि व्यावसायिक ढाबा देखभालीसाठी करार पद्धतीने एका आदिवासी कुटुंबाला देण्यात आले आहे. यावेळी चिर्ले येथील 8 जणांनी याठिकाणी येऊन जागामालक हे नसल्याने येथे देखभालीसाठी असलेल्या आदिवासी कुटुंबाला तेथून निघून जाण्यासाठी धमाकावू लागले. तसेच, त्या 8 जणांनी या आदिवासी कुटुंबाला शिवीगाळ करून त्यांचे अन्नाधान्य उध्वस्त केल्याचा प्रकार घडला हाता.
याबाबत आदिवासी कुटुंबाने जागा मालक संजय पाटील यांच्याकडे घटना सांगितल्यानंतर मे 2024 रोजी त्यांनी उरण पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी तक्रार घेणे टाळले. यानंतर दि.29 मे 2024 रोजी त्यांनी उरण पोलिसात लेखी निवेदन दिले. याबाबत उरण पोलिसांकडून मागील 9 महिन्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळाले नाही. त्यानंतर मात्र अंकुश वाघमारे यांनी 8 फेब्रुवारी रोजी त्यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाचे निवेदन जिल्हाधिकारी, समाजकल्याण अधिकारी अलिबाग, प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण विभाग बेलापूर, समाजकल्याण विभाग आयुक्त पुणे, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई, सामाजिक न्यायमंत्री, मंत्रालय मुंबई, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग पुणे, सामाजिक न्याय व अधिकारिता विभाग दिल्ली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च न्यायालय मुंबई येथे स्पीड पोस्टद्वारे पाठविली आहे.