उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांच्या गाव बैठका

। कोलाड । वार्ताहर ।
दहीहंडी व गणेश उत्सव सण अवघ्या काहि दिवसांवर येथून ठेपला असल्याने कोलाड विभागात कोलाड सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांनी गावो गावी गावं बैठका आयोजित केल्या असून,येणारे सर्व सण कोरोना काळातील नियमांचे पालन करून शांततेत पार करावे असे आहवान पोलीस करीत असून यावेळी रोहे उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यवंशी उपस्थित होते.कोलाड पोलीस ठाणे हद्दीतील हिंदू समाज अध्यक्ष, गाव-अध्यक्ष,सरपंच,तंटामुक्ती अध्यक्ष,शांतता कमिटी सदस्य,पोलीस उपनिरीक्षक,पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

सध्या कोरोनाचा पादुर्भाव कमी झाला असला तरी तिसरी लाट येण्याची संभावना असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर 30 ऑगस्ट रोजी गोकुळाष्टमी व 10 सप्टेंबर रोजी गणेश उत्सव सण असल्याने कोलाड विभागात पोलीस अधिकारी सुभाष जाधव साहेब हे ठिकठिकाणी गाव बैठका घेत अजून या बैठकीत हे सण शांततेत तसेच कोरोना काळातील नियमांचे पालन करून करावे असे आहवान करीत आहेत.

यावेळी रोहे उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यवंशी आंबेवाडी येथील घेतलेल्या बैठकीमध्ये उपस्थित होते. यावेळी गणेशोत्सवच्या मार्गदर्शक सूचना 2021 ची परिपत्रके वाटप करण्यात आली असून, सर्वाना उत्सव साध्या पध्दतीने पार पडण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच गोपाळकाळा,गणेशोत्सव या सणामध्ये दरवर्षी मिरवणूका काढण्यात येतात यावर्षी शासनाचे निर्बंध असल्याने मिरवणूका काढता येणार नाही याबाबत सांगण्यात आले आहे. तसेच गावातील काही वाद विवाद असल्यास माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी दिले आहे.

Exit mobile version