पोलिसांची मटका अड्ड्यावर धडक कारवाई

| तळा | वार्ताहर |

तळा शहरात पोलिसांनी मटका अड्डयावर धडक कारवाई करून एकाला ताब्यात घेतले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, तळा शहरात भर बाजारपेठेत बसस्थानकाच्या मागच्या बाजूस मटका अड्डा चालविला जात असल्याची माहिती तळा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मटका अड्डयावर छापा मारला असता त्याठिकाणी आरोपी जनार्दन नथुराम मोरे, रा. फोंडलआळी हा लोकांकडून पैसे स्वीकारून पावतीवर मटक्याचे आकडे लिहून चिठ्ठयांद्वारे गैर कायदेशीररित्या मटका जुगार चालवीत असताना मिळून आला. याबाबत आरोपी जनार्दन नथुराम मोरे याच्यावर तळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार प्रफुल्ल चांदोरकर हे करीत आहेत.

Exit mobile version