| अलिबाग | वार्ताहर |
स्वयंसिद्धा संचलित स्पर्धा विश्व अकॅडमीमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच पोलीस रेसिंग डे व सप्ताह अंतर्गत पोलीस रिझिंग डे साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाकरिता अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे , अॅड.निहा राऊत, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी, स्पर्धा विश्व अकॅडमीच्या संचालिका तथा स्वयंसिद्धा संस्थेच्या अध्यक्षा सुचिता साळवी व इतर पोलीस कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी यांनी केले तदनंतर पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी उपस्थित स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधताना पोलीस रेझिंग डे चे महत्व तसेच हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू यासंदर्भात माहिती दिली. जनता आणि पोलीस यांच्यामध्ये चांगले संबंध निर्माण व्हावे पोलिसां विषयी वाटणारी भीती कमी व्हावी तसेच पोलीस हे जनतेच्या सेवेसाठीच तत्पर असतात असे सांगितले तसेच सध्या बदलत चाललेल्या कायद्यांचे स्वरूप, जुन्या कायद्यांमध्ये झालेले बदल नवीन कायदे कसे उपयुक्त ठरतात तसेच गुन्ह्यांचे बदलणारे स्वरूप, अलीकडे सायबर गुन्ह्यांमध्ये होत चाललेली वाढ व त्यातून होणारे फसवणुकीचे प्रकार रोखण्याकरिता आपण काय तत्परता व काळजी घेतली पाहिजे याविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांना दिली.