गोखले महाविद्यालयात पोलीस भरती मार्गदर्शन शिबीर

| बोर्लीपंचतन | वार्ताहर |

राज्यभर विविध जिल्ह्यात आगामी काळात पोलीस भरतीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने रायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र-गरूडझेप आणि करिअर गायडन्स यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीवर्धन तालुक्यातील पोलीस भरतीस पात्र असलेल्या आजी-माजी विद्यार्थ्यांसाठी गोखले महाविद्यालयात दि. 28 व 29 सकाळी 10.30 वा. असे दोन दिवस पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी श्रीवर्धन प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसीलदार सचिन गोसावी, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी, पोलीस निरीक्षक संजय पाटील मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. या शिबिराचा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा, असे आवाहन गोखले महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version