| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या गोदी विभागतील वरिष्ठ सहाय्यक गोदी प्रबंधक संजीव शृंगारपुरे हे 31 मार्च 2022 रोजी 39 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर पोर्ट ट्रस्टमधून सेवानिवृत्त होत आहेत, त्यानिमित्ताने गोदी विभागातील इनडोअर व आऊटडोअर कर्मचार्यांतर्फे इंदिरा गोदीत हमालेज बिल्डिंग, पहिला माळा येथे मुंबई पोर्ट ट्रस्टचे वरिष्ठ उपगोदी प्रबंधक आर. एन. शेख यांच्या हस्ते त्यांचा शाल,श्रीफळ, फेटा व सन्मानचिन्ह देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.
यावेळी सुधाकर अपराज, मारुती विश्वासराव, बबन मेटे, कल्पना देसाई, मिलिंद घनकुटकर, शेनॉय, देशमुख, रफिक कुरेशी, आर. एन. शेख, शेनगर, तिवारी, एस. व्ही. प्रकाश, संजीव कुमार, राऊत, इथापे, मुळीक, बबन हडवळे ,दत्ता खेसे, निसार युनुस, संजय माधव, आर.जे.सावंत, स्वामी, यादव, झरकर, शैलेश चव्हाण, डेल्फिन कोलासो, हंसराज सावंत, सिद्धेश शिगवण, गजभिये, कटारनवरे, जाधव, दळवी, केवट आदी उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन गजेंद्र हिरे व अंबिके यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक खताळ ए.आर.इ.पटेल, अशोक राऊत, संदीप घागरे, अशोक वाळुंज, थळकर, विजय गुरव, आनंद एकावडे इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले.