विद्युतपुरवठा पूर्ववत, ग्रामस्थांची सुटका

| खांब-रोहा | वार्ताहर |
सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी विद्युत समस्येचा सामना करावा लागत आहे. अशातच रोहा तालुक्यातील मुठवली खु. येथे विद्युत डीपीच उडाल्याने संपूर्ण गाव अंधारात गेला होता. या वीजसमस्येच्या संकटसमयी आ. अनिकेत तटकरे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे गावातील विद्युतपुरवठा पूर्ववत झाल्याने ग्रामस्थांची विद्युत समस्येपासून सुटका झाली.

सध्या सर्वत्र होत असलेली मुसळधार पर्जन्यवृष्टी व अधून मधून वाहणारे वारे यांचा सर्वच क्षेत्राला फटका बसत आहे. या पावसात विद्युत समस्याही निर्माण होत असल्याने नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. तर, मुठवली खु. येथे मागील आठवड्यात मुसळधार पावसामुळे विद्युत डीपीच उडाल्याने पूर्ण गाव अंधारात गेला होता.अशावेळी आ.अनिकेत तटकरे यांच्याशी येथील महेश तुपकर यांनी संपर्क साधून आपली समस्या सांगितली. आ.अनिकेत तटकरे यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून विद्युत डीपी बसवून विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात आला.

Exit mobile version