। कोल्हापूर । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र स्टेट पॉवरलिफ्टिंग असो. व कोल्हापूर जिल्हा पॉवरलिफ्टिंग असो. यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सब ज्युनियर व ज्युनिअर क्लासिक पुरुष व महिला राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा दि.20 ते 25 मे या कालावधीत कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापिठातील राजमाता जिजाऊ दीक्षांत सभागृहात महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असो.चे सचिव संजय सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी कोल्हापूर जिल्हा पॉवरलिफ्टिंगचे सचिव डॉ. प्रशांत पाटील आणि त्यांचे सहकारी प्रा. विजय वडगावकर यांच्याकडे आहे. या स्पर्धेसाठी भारतातील 26 राज्यांतून 352 पुरुष व 256 महिला खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. त्याचबरोबर 40 आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय नामवंत खेळाडूंसह महाराष्ट्रातील नामवंत पंच व पदाधिकारी सुद्धा उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी औरंगाबाद येथे राष्ट्रीय बेंचप्रेस स्पर्धा 2023मध्ये आयोजित करण्यात आलेली होती.