। माणगाव । प्रतिनिधी ।
कुंभार्ते गावच्या बस स्टॉपजवळ दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला आहे. संतोष लक्ष्मण लमानी (40) असे अपघातातील मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. 16) रात्री 9.15 वाजताच्या सुमारास संतोष लमानी हे त्याच्या ताब्यातील दुचाकी (एम एच 06 बी क्यु 1432) घेऊन जात असताना कुंभार्ते गावच्या बस स्टॉपजवळ आले असता रस्त्यात कुत्रा आल्याने त्यांनी अचानक ब्रेक लावला. त्यामुळे दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात दुचाकीचालक संतोष यांचा मृत्यू झाला. तसेच, या अपघतात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.
या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. स. ई. काळे करीत आहेत.