। रसायनी । वार्ताहर ।
विद्या दानाचे पवित्र कार्य करीत असताना सामाजिक क्षेत्राशी निगडीत कार्य करणारे शिक्षक प्रदीप पाटील यांना ‘खान्देश भूषण’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. प्रदीप पाटील यांना श्री सप्तशृंगी चॅरिटेबल ट्रस्ट सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांच्या वर्धापनदिनी जेष्ठ पत्रकार निलेश खरे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. विद्यार्थ्यांना आयुष्यात कसे जगायचे आणि तुम्ही कसे जगायला हवे, याबाबतचे मार्गदर्शन त्यांच्याकडून करण्यात येत आहे. तसेच, दर गुरूवारी जुईनगर येथील श्री स्वामी समर्थ मठात लोकांना अंधश्रद्धा बरोबर भक्ती म्हणजे काय, याबाबत एक बोधपर मार्गदर्शन करत असताता. प्रदीप पाटील यांनी शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक कार्यात आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मान देण्यात आला आहे.