रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सहकार्य
। खोपोली । प्रतिनिधी ।
पनवेल तालुक्यातील मध्यम वर्गीय कुटुंबातील युवक डॉ. ओंकार चंद्रकांत रोकडे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून रशियात 6 वर्षाचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून एमबीबीएस पदवी प्राप्त केली आहे. तसेच, त्याने भारतात येऊन एफएमजीए उत्तीर्ण होत आपल्या पदवीवर शिक्कामोर्तब केले. डॉक्टर झालेल्या ओंकारचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पनवेल येथे झाले आहे. तसेच, त्यांनी गोरगरीब जनतेची सेवा करण्याचा निर्धार केला आहे.
डॉ. ओंकार रोकडे यांच्या या संघर्षमय प्रवासात रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेत कार्यरत असलेले त्याचे वडील आणि शिक्षिका असलेली आई हेमलता यांनी मोलाची साथ दिली. विशेष म्हणजे परदेशातील महागडे उच्च वैद्यकीय शिक्षण कसे पूर्ण करावे, असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यावेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेने सवलतीच्या दरात शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करून आशेचा किरण दाखविला. पुढे संजीवन जाधव यांनी डॉ. ओंकार रोकडे यांना वेळोवेळी महत्वाचे मार्गदर्शन केले. यापुढे डॉ. ओंकार रोकडे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युतर शिक्षण घेण्याचा संकल्प केला आहे. माझ्या आई-वडिलांचे कष्ट मी पाहत आहे. त्यामुळे सामाजिक जाणिवेतून वैद्यकीय क्षेत्रात गोरगरिबांच्या सेवा करणार, अशी प्रतिक्रिया डॉ. ओंकार रोकडे यांनी दिली आहे.
रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांचे ऋण मी कधीही विसरू शकणार नाही. बँकेने वेळोवेळी आर्थिक साह्य केल्यामुळेच मी माझे शिक्षण पूर्ण करू शकलो; अन्यथा हे महागडे शिक्षण माझ्यासाठी खुप कठिण होते. माझ्या यशामध्ये जयंत पाटील यांनी केलेल्या अर्थिक सहकार्याचे खरे श्रेय आहे.
डॉ.ओंकार रोकडे