। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
सिडको एम्प्लॉइज युनियनच्या निवडणुक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत पुन्हा एकदा प्रगती पॅनल विजयी झाले आहे. प्रगती पॅनल मागील 20 वर्षापासून सत्तेवर आहे. सिडको एम्प्लॉइज युनियन ही महाराष्ट्रातील एक बलाढ्य कामगार संघटना म्हणून ओळखली जाते.
दरम्यान, सिडको महामंडळातील आव्हाने पाहता एक सक्षम युनियन निवडून देणे खूप गरजेचे होते. यावेळी सिडको कर्मचार्यांनी समता पॅनलचा धुव्वा उडवून पुन्हा एकदा प्रगती पॅनलवर विश्वास ठेवला आहे. तसेच, अध्यक्षपदी नरेंद्र हिरे, सरचिटणीसपदी नितीन कांबळे, उपाध्यक्ष पदी संजय पाटील, प्रमोद पाटील, चिटणीसपदी यतिष पाटील, खजिनदारपदी सुभाष पाटील, सह चिटणीसपदी सुधीर कोळी, रवींद्र डोंगरे, सुबोध भोईर व 15 सदस्यांची निवड करण्यात आली आहे.