| पनवेल | वार्ताहर |
तालुक्यात अनेक विकास कामे तसेच इमारतींची कामे सुरू आहेत. त्यातच अपघातांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. दरम्यान, टी पॉईंटकडून सिमेंट बल्कर कळंबोलीच्या दिशेने जात होता. त्यावेळी उड्डाण पुलावरून जात असताना चालकाचा बल्करवरील ताबा सुटला आणि तो रस्त्याच्या पलीकडे पलटी झाला. त्यात असलेला सिमेंटचा माल देखील बाहेर पडला. या अपघातात बल्करवरील चालक थोड्याफार प्रमाणात जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले होते. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.