। चिरनेर । प्रतिनिधी ।
उरण पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी संतोषसिंग डाबेराव हे आपल्या 28 वर्षाच्या सेवेतून निवृत्त झाले आहेत. त्यांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा शुक्रवारी (दि.28) रोजी पंचायत समितीच्या कार्यालयात पार पडला. यावेळी उरण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विनोद मिंडे, कक्षा अधिकारी जितेंद्र चिर्लेकर, कर्मचारी युवराज पाटील, पाणीपुरवठा विभागाचे चव्हाण, पशुधन विकास अधिकारी डॉ. सोमनाथ भोजने तसेच धाटावकर यांनी डाबेराव यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले. तर, अध्यक्षीय भाषणात गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांनी त्यांच्या कार्यालयीन कामाबद्दल प्रशंसनीय उद्गार काढले.