महाजने बौध्दवाडी प्रीमियर लीग स्पर्धेत प्रशांत दादा वॉरिअर्स अंतिम विजेता

एक दिवस गावासाठी आणि एकजूटीसाठी संकल्पना

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

महाजने बौध्दवाडी प्रिमिअर लिग क्रिकेट स्पर्धेचे तिसरे पर्व रविवारी(दि. 8) महाजने येथे झाले. या स्पर्धेतील अंतिम विजेता प्रशांत दादा वॉरिअर्स संघ ठरला.या संघाला प्रथम क्रमांकाचे चषक देऊन सन्मानित करण्यात आले. चित्तथरारक असा हा सामना झाला. या सामन्यात प्रशांत दादा वॉरिअर्स संघाने दमदार कामगिरी करीत विजय मिळविला.एक दिवस गावासाठी आणि एकजूटीसाठी या संकल्पनेतून हा उपक्रम सुरु करण्यात आला.

महाजने येथील मोठा माळ मैदानात रविवारी(दि.8) घेण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन गावांतील सल्लागार राम जाधव, संतोष जाधव व महिलांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संघ मालक प्रकाश जाधव, अमर जाधव, महेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते सदानंद दुधाळे,कप्तान, खेळाडू आणि क्रिडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.अंतिम सामना प्रशांत दादा वॉरिअर्स आणि प्रशिक इलेव्हन या संघात झाला. प्रशांत दादा वॉरिअर्स संघाने तीन षटकांमध्ये 40 धावा केल्या. प्रशिक इलेव्हन संघासमोर 41 धावांचे आव्हान होते. मात्र प्रशांत दादा वॉरिअर्स संघाने तीन षटकांत 33 धावांमध्ये खेळ आटोपून विजय आपल्याकडे खेचून घेतला. चित्तथरारक असा हा अंतिम सामना झाला. प्रशिक इलेव्हन संघाला शेवटच्या सहा चेंडूत 14 धावांची आवश्यकता होती. परंतू प्रशिक जाधव या गोलंदाजाने शेवटपर्यंत फलंदाजांना रोखून ठेवले. अखेर शेवटच्या दोन चेंडूत सात धावांची गरज होती. गोलंदाजाने कौशल्य दाखवत प्रशांत दादा वॉरिअर्स संघाला सात धावांनी विजय मिळवून दिला. या स्पर्धेत शुभम जाधव, प्रशिक जाधव, सुयश पाटील, पारस मोहिते, संघर्ष जाधव, पार्थ जाधव, बाळाराम जाधव, प्रकाश जाधव यांची महत्वपूर्ण भुमिका ठरली. त्यामुळे प्रशांत दादा वॉरिअर्स संघ अंतिम विजेता ठरला. प्रशिक इलेव्हन संघाने द्वितीय, अंबराई संघाने तृतीय क्रमांक मिळविला. तसेच शुभम जाधव या खेळाडूला सामनावीर, प्रशिक जाधव या खेळाडूला उत्कृष्ट गोलंदाज, सुयश पाटील या खेळाडूला स्पर्धेचा मालिकावीर आणि उत्कृष्ट फलंदाज म्हणून सुशांत जाधव या खेळाडूला गौरविण्यात आले. बक्षीस वितरण गावांतील महिलांच्या हस्ते करण्यात आले.

संघर्ष योध्दाच्या नावाने प्रशांत दादा वॉरिअर्स संघ
महाजने गावातील प्रशांत जाधव हे एक नावाजलेले व्यक्तीमत्व होते. एक संघर्ष योध्दा होते. मेहनती, कष्टाळू अशी त्यांची ख्याती होती. सामाजिक कार्यातदेखील ते सक्रीय होते. परंतु एका अल्पशा आजारामुळे वयाच्या 32व्या वर्षी त्यांचे 12 ऑगस्ट 2012 मध्ये निधन झाले. त्यांची आठवण म्हणून त्यांचे बंधू प्रकाश जाधव यांनी प्रशांत दादा वॉरिअर्स नावाने संघ तयार केला. त्यांनी संघ मालक म्हणून भूमिका बजावली. एमबीपीएल क्रिकेट स्पर्धेत या संघाने प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल जल्लोष साजरा करण्यात आला. एका संघर्ष योध्दा अर्थात वॉरिअर्सला यातून श्रध्दांजली देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
Exit mobile version