। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेकापचे तरुण तडफदार नेते, माजी उपसरपंच स्व. प्रविण कदम यांचे मागील वर्षी अकस्मात निधन झाले. त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी प्रेरणा कदम यांची सर्व पक्षाकडून एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. कोणत्याही सदस्यांनी अर्ज न भरता सहकार्य केले. त्या बद्दल सर्वपक्षीय सदस्यांचे आभार मानले.
उपसरपंच पदी निवड होताच प्रेरणा कदम यांचे शेकाप महिला आघाडी प्रमुख तथा नगरसेविका चित्रलेखा पाटील यांनी शुभेच्छा देत अभिनंदन केले. याप्रसंगी तालुका चिटणीस अनिल पाटील, सरपंच राजेंद्र म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रविण कदम यांचे कार्य कधीही विसरता येणार नाही. ते तरुणांचे आदर्शवत नेतृत्व होते. त्यांच्या जाण्याने शेकापमध्ये कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांना कधीही विसरता येणार नाही, असे चित्रलेखा पाटील यांनी यावेळी सांगितले.