बेलोशी येथील प्रीतम गुंड यांचा शेकापक्षात प्रवेश

शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांनी केले स्वागत
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
तालुक्यातील रामराज विभागातील बेलोशी येथील प्रीतम गुंड यांनी शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील ,तालुका चिटणीस अनिल पाटील यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. अलिबाग शहरातील शेतकरी भवन येथे सदर पक्ष प्रवेश समारंभ झाला.
यावेळी सदानंद थळे, शेकाप पुरोगामी युवा संघटनेचे अलिबाग तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे, महेंद्र विद्रे, वैभव मुकादम, संदेश वारगे, संदीप मोरे, मंगेश गुंड, संदीप वारगे, संतोष भोपी, सतीश वारगे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
बेलोशी गावातील व्दारकानाथ गुंड तथा तात्या हे पुर्वी पासून शेकापचे कट्टर कार्यकर्ते होते. त्यांची दोन्ही मुले प्रसाद व प्रितम सतत पक्षासाठी कार्यरत असायची. मात्र काही कारणाने ती पक्षापासून लांब होती. मात्र तात्यांच्या बोलण्यातून पक्षाबद्दल आदर दिसुन यायचा. तसेच प्रसाद व प्रितम कधीच शेकाप कार्यकर्त्या पासुन अलिप्त असे कधीच जाणवले नाही. याला कारण पिढीजात हे शेकापक्षाशी बांधीलकी असलेले घराणे आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रीतम गुंड स्वगृही परतल्याने या विभागातील कार्यकर्त्यांच्या उत्साहात वाढ झाली आहे. बेलोशी येथील एक जुनं जाणत कुटुंब पुन्हा एकदा शेकाप सोबत आल्याने शेकापचे नक्कीच बळ वाढेल.

Exit mobile version