प्रितम म्हात्रेंचा भाजपला थेट इशारा!

येत्या काळात शेकामध्ये इनकमिंगची लाट आणणार

। पनवेल । प्रतिनिधी ।

उरण विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे प्रितम म्हात्रे यांचे भाजपसमोर मोठे आव्हान असणार आहे, असे चित्र म्हात्रे यांना मतदारसंघात मिळणार्‍या उत्स्फूर्त प्रतिसादावरून दिसत आहे. रविवारी पळस्पे गावामध्ये प्रितम म्हात्रे यांनी भेट दिली असता मोठा जनसमुदाय त्यांच्या स्वागतासाठी हजर होता.
उरण विधानसभा मतदारसंघातून प्रितम म्हात्रे हेच पुढचे आमदार असावेत, अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचा प्रत्यय प्रितम म्हात्रे यांच्यासाठी जमा होणार्‍या गर्दीवरून दिसत आहे. उरण विधानसभा मतदारसंघातून काही झाले तरी आपण निवडणूक लढवणार असून येत्या काळात भारतीय जनता पक्षामधून शेतकरी कामगार पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात इनममिंग होणार असल्याचे संकेत प्रितम म्हात्रे यांनी पळस्पेमध्ये बोलताना दिले.

बीजेपी खाली करू!
निवडणुकीसाठी फॉर्म भरणारच आहोत. ज्या दिवशी आपण फॉर्म भरू, त्या दिवसापासून पुढच्या तीन दिवसांत 30 टक्के बीजेपी खाली करूफहे उद्गार काढताच टाळ्या आणि शिट्यांनी प्रितम म्हात्रे यांना उपस्थितांनी प्रतिसाद दिला.
Exit mobile version