पर्यावरण मित्र पुरस्कार प्रदान
पनवेल | प्रतिनिधी |
राज्यपालांच्या हस्ते पनवेल मनपाचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांना पर्यावरण मित्र पुरस्कार देण्यात आला. राष्ट्रीय वन हुतात्मा दिनाचे औचित्य साधून राज भवन मुंबई येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आधुनिकीकरणा बरोबरच निसर्गाचं पर्यावरण राखण्यासाठी महाराष्ट्रातील तरुण युवक पुढे येतात अशा युवकांच्या कार्याची दखल घेऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रीतम जनार्दन म्हात्रे यांना पर्यावरण मित्रपुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी लेखक चंद्रकांत शहासने लिखित *पर्यावरण विचार* ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
प्रीतम म्हात्रे यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव
