पृथ्वीराज चव्हाणांचा उदयनराजेंवर हल्लाबोल

| सातारा | प्रतिनिधी |

आपली राज्यघटना शिल्लक राहणार आहे की नाही? लोकशाही टिकणार आहे की नाही? याचा फैसला या निवडणुकीतून होणार आहे. राष्ट्रवादीने 3 वेळेस खासदार करुन पाठवलं, एकदाही आम्हाला भेटायला परत आला नाही. आम्ही इथं मत देणार नाहीत. आम्ही एकाबाजूला 2 आमदार आहोत. त्यांच्याकडे 4 आमदार आहेत. पालकमंत्री तिकडे आहेत. त्या पदाचा वापर रोज केला जातोय. शिंदे-फडणवीस सरकारशी आपल्याला लढायचे आहे. आपल्याला माहिती आहे की, विरोधी पक्षाच्या खासदारांनी गद्दारी केली. तीनदा निवडून दिलं तरीही पक्ष बदलला. तेव्हा श्रीनिवास पाटलांनी त्यांना पराभूत केलं. आता तर 3 पक्ष आपल्यासोबत आहेत, असे काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. त्यांनी भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला. सातार्‍यात महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. यावेळी पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. यावेळी शरद पवारही उपस्थितही होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, तीन पक्ष एकत्र आले आहेत, त्यामुळे आता मताधिक्य वाढलं पाहिजे. महागाई, बरोजगारी, शेतकरी आत्महत्या, भ्रष्ट्राचार, नैतिक भ्रष्ट्राचार हे महत्वाचे मुद्दे आहेत. ऑपरेशन लोटसच्या नावाखाली नैतिक भ्रष्ट्राचार केलाय. नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील सरकार पाडलं. खोक्यांचा बाजार केला, काही जणांना राज्यसभा दिली. आज इंडिया आघाडीच्या वतीने शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. अचानक उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांना निवडून देण्याचे काम आपण करुयात, असंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

लोकसभेच्या निवडणूकीचा रंग चढला आहे. यात बरेचसे नेते असे आहेत की जे आश्‍वासनच देत आहेत. लहान मुलांना निवडणुकीत मतदार जनजागृती करीत असतांना याच मुलांच्या हस्ते मतदान करण्यासाठी संकल्प आवेदन पत्र पालकांकडून भरुन घेऊन प्रत्यक्षात नसेल तरी अप्रत्यक्षपणे या लहान मुलांचा निवडणुकीत सहभाग घेतलेलाच आहे.

Exit mobile version