केनियन स्पर्धकांकडून प्रियांशीचे कौतुक

| शिहू | वार्ताहर |
कोकण हिल चॅलेंज हाफ मॅरेथॉन रोटरी क्लब ऑफ इंडिया व सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि.18 डिसेंबर रोजी रोहा येथे 21 कि. मी, 10 कि. मी, 5 कि. मी व 3 कि मी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शिहू येथील राष्ट्रीय कबड्डी पंच विजय भोईर यांची सात वर्षीय कन्या प्रियांशी भोईर हिने 5 किलोमीटरचे अंतर यशस्वीरित्या पार केल्याबद्दल केनियावरून आलेल्या स्पर्धकांनी तिचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धेचे आकर्षण असलेल्या केनियाच्या स्पर्धकांनी 21 किलोमीटरचे अंतर अवघ्या 72 मिनिटांत पार करून विजयी ठरले, तर प्रियांशी विजय भोईर (7) व महती अमित पाटील (10) या लहान स्पर्धकांनी पाच कि.मी.चे अंतर पार केल्याबद्दल आयोजकांच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version